दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी राजू सुलिरेला अटक

दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

१५० खरेदीदारांना दोन फ्लॅट विकून ३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील एका बिल्डरला अटक करण्यात आली आहे. बिल्डरचे साथीदार सध्या फरार आहेत. तिसरा फ्लॅटही अशाच पद्धतीने विकला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

विरारमध्ये सुरु असलेल्या रहिवासी प्रकल्पामध्ये बेंगळुरूच्या एका बिल्डराने दोन फ्लॅटची तब्बल १५० खरेदीदारांना विक्री करून ३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी बिल्डरला पोलिसांनी अटक केली असून तिसरा फ्लॅटही अशाच प्रकारे विकला गेला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

मंदार हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आरोपी राजू सुलिरे याला मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने बेंगळुरू येथून अटक केली.त्याचे साथीदार अविनाश ढोले, विपुल पाटील, अल्लाउद्दीन शेख, युसूफ खोतवाला व इतर साथीदार सध्या फरार आहेत. रिअल इस्टेट फर्मचे विरार आणि नालासोपारा येथे प्रकल्प आहेत.

हे ही वाचा:

शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!

महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!

माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा!

इस्रायलच्या सैन्यांच्या श्वानांचा क्रूर हल्ला; हमासचे दहशतवादी ठार!

२०११ ते २०१८ कालावधी दरम्यान १५० हून अधिक ग्राहकांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या तक्रारी अर्नाळा पोलिस स्टेशन, विरार (पश्चिम) येथे नोंदवण्यात आल्या होत्या.क्राईम ब्रँच युनिटकडून न सुटलेल्या प्रकरणांचा तपास करत असताना मुख्य संशयित आरोपी राजू सुलिरे याचा शोध सुरु झाला.त्यानंतर पोलिसांनी शोध घेत आरोपी राजू याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली.’मार्केटच्या खाली’ दरात फ्लॅट विकत असल्याचा आरोपीने पोलिसांना सांगितले.आरोपींनी १५० संभाव्य खरेदीदारांना दोन किंवा तीन फ्लॅट दाखवले आणि विक्रीचे करारही करून घेतले.
फ्लॅट अनेक खरेदीदारांना विकल्याचे तपासात समोर आले आहे. फ्लॅटचा ताबा देण्यास विलंब झाल्यास व्याज देण्याचे आश्वासन देऊन ग्राहकांना विश्वासात घेतल्याचं तपासात दिसून आलं.

निवासी टॉवर बांधण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.आरोपी सुलिरेला पोलिसांनी त्याच्या बेंगळुरूमधील घरातून सापळा रचत अटक केली.पोलिसांच्या एका पथकाने त्याला गुरुवारी दक्षिण शहरातून अटक केली.आरोपी राजू सुलिरे याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

 

Exit mobile version