जम्मू -काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुलवामा जिल्ह्यातील लष्करच्या एका कमांडरला ड्रंगबल पंपोर येथे सुरू केलेल्या कारवाईदरम्यान अटक केल्याचा दावा केला आहे. ताज्या माहितीनुसार, त्यानंतरच्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून दुसरा दहशतवादीही ठार झाल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी अडकलेल्या कमांडरची ओळख उमर मुश्ताक खांडे अशी केली आह.हा काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या टॉप दहा कमांडरपैकी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खांडेचा दोन पोलीस हवालदारांच्या हत्येत सहभाग आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय यांच्या हवाल्याने दिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बघाट श्रीनगर येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येत आणि इतर दहशतवादी गुन्ह्यांमध्ये उमर मुस्ताक खांडे याचा समावेश आहे.”
सलीम पर्रे, युसूफ कंत्रू, अब्बास शेख, रियाज शेटेरगुंड, फारुख नली, जुबैर वाणी आणि अशरफ मोलवी, साकीब मंझूर आणि वाकील शाह यांच्यासह ऑगस्टमध्ये पोलिसांनी उमरला पहिल्या दहा अतिरेकी निशाण्यांमध्ये स्थान दिले होते.
शुक्रवारी दुपारनंतरची ही तिसरी कारवाई आहे ज्यात श्रीनगरमधील एक नागरिक आणि पोलिस उपनिरीक्षकाच्या हत्येत पोलिसांच्या माहितीनुसार दोन दहशतवादी मारले गेले.
हे ही वाचा:
बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!
‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’
राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी
मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली
पोलिसांनी मारलेल्या अतिरेक्यांची ओळख शाहिद बशीर शेख आणि तन्झील अहमद, दोघेही श्रीनगरचे रहिवासी आहेत. “दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबतच्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुलवामा आणि श्रीनगरमध्ये दोन ऑपरेशन करण्यात आले. परिणामी एलईटी (टीआरएफ) चे दोन अतिरेकी ठार झाले आणि जे एका नागरीक आणि एका प्रोबेशनरी पोलिसांच्या अलीकडच्या हत्येत सहभागी होते.” असं आयजी कुमार म्हणाले.