जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!

पाकिस्तानच्या दहशतवाद्याचा समावेश

जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे गुरुवारी सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक असून त्याचे नाव क्वारी असे आहे. यावर्षीच्या जून महिन्यात करण्यात आलेल्या धनगरी आणि कांडी या दुहेरी हल्ल्याचा मास्टरमाईंड क्वारी असल्याचे मानले जात आहे.या हल्ल्यात सात लोक मारले गेले होते.

क्वारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तानी दहशतवाद्याला पाकिस्तान आणि अफगाणमधून प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच तो लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ नेता होता. या संघटनेचा एक भाग म्हणून तो गेल्या वर्षभरापासून राजौरी-पुंछ भागात सक्रिय होता.क्वारी हा धनगरी आणि कांडी या दुहेरी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे मानले जाते, ज्यात सात लोक मारले गेले होते व १४ गावांचे नुकसान झाले होते.क्वारीला राजौरी-पुंछ येथील दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यासाठी पाठवण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे.क्वारी हा आयईडीएस मध्ये तज्ञ होता.तसेच गुहांमध्ये लपून काम करत होता आणि एक प्रशिक्षित स्निपर देखील होता.

हे ही वाचा:

ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!

हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता इस्रायली तरुणीचा मृतदेह सापडला!

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये बुधवार पासून सुरक्षा दल आणि दहशदवाद्यांनामध्ये चकमक सुरु झाली.या चकमकीत भारताचे चार जवान शहीद झाले, ज्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता.जखमी झालेल्या जवानांना उधमपूर येथील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

रात्रभर चकमक थांबल्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील धर्मसाल पट्ट्यामध्ये येणाऱ्या बाजीमाल भागात पुन्हा गोळीबार सुरू झाला.दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी अतिरीक्त सुरक्षा दलांचा समावेश करून जंगली प्रदेशाला वेढा घालण्यात आला होता.

Exit mobile version