छत्तीसगडच्या राजधानीच्या शहरातील रायपूर विमानतळावर मोठा अपघात घडला आहे. गुरुवार, १३ मे रोजी रात्री ९.१० च्या सुमारास हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. या हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव अशी मृत पावलेल्या पायलट्सची नावे आहेत.
काल रात्री ९.१० वाजता हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळले. दरम्यान हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला असून दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जखमी झालेल्या पायलट्सना रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रायपूर विमानतळावरील अपघातानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. “रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत दुःखद माहिती मिळाली. देव त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो आणि दु:खाच्या प्रसंगी दिवंगत आत्म्याला शांती देवो.” असे ट्विट भुपेश बघेल यांनी केले आहे.
अभी रायपुर में एयरपोर्ट पर स्टेट हेलीकॉप्टर के क्रैश होने की दुखद सूचना मिली.
इस दुखद हादसे में हमारे दोनों पायलट कैप्टन पंडा और कैप्टन श्रीवास्तव का दुखद निधन हो गया है।
इस दुःख की घड़ी में ईश्वर उनके परिवारजनों को संबल एवं दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे।
ॐ शांति:
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 12, 2022
हे ही वाचा:
…आणि अयुब पटेलशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले!
आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी डीजीसीए आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सविस्तर तांत्रिक तपासणी केली जाणार असून मृत वैमानिकांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले आहेत.