26 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरक्राईमनामाभेंडी बाजारमध्ये दोन कामगार बांधकामस्थळी अपघातात मृत्युमुखी

भेंडी बाजारमध्ये दोन कामगार बांधकामस्थळी अपघातात मृत्युमुखी

Google News Follow

Related

भेंडी बाजारमध्ये दोन कामगारांचा बांधकामस्थळी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. भेंडी बाजार येथे सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) क्लस्टर प्रोजेक्टचे काम सुरू आहे तिथे हा अपघात घडला.

सोमवारी दुपारी हे दोन वेगवेगळे अपघात घडले. अपघाती मृत्यूची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

दिनांक ६ जून रोजी दुपारी सव्वा चार वाजता एस.बी.यु.टी. क्लस्टर १, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार या ठिकाणी हायड्रा मशिनने क्रेनचा सुमारे १५ किलो वजनाचा लोखंडी मास्क उचलताना मास्कला बांधलेला सुती पट्टा निसटल्याने मास्कचा तोल गेला आणि त्याखाली काम करणारा इसम किस्मत रिझाय्युल शेख, वय २५ वर्षे, राहणारा रामघाटी, मौजा गललचंदी ११३, कुरुननाहर लाभपुर पंचायत, पोस्ट तिबा, जि. बिरभूम, पश्चिम बंगाल याचेवर पडला.  पाठीवर लागल्याने त्यास गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्याला तात्काळ साबु सिद्दीकी मॅटरनिटी जनरल हॉस्पीटल, इमामवाडा रोड, मोगल मस्जीद मुंबई या ठिकाणी उपचारार्थ भरती केले असता त्यास डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. सदर बाबत अपमृत्यु नोंद क्रमांक ६४/२२ कलम १७४ सी.आर.पी.सी. प्रमाणे नोंद करण्यात आली. गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवण्यात आली.

हे ही वाचा:

मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना तुरुंगवास

काश्मीरमध्ये वासुकी नाग मंदिराची तोडफोड

दूरदर्शनचा आवाज काळाच्या पडद्याआड; प्रदीप भिडे यांचे निधन

५० लाख खर्च केले पण विजयदुर्ग दयनीयच!

 

याशिवाय, सय्यद अली मोहम्मद अब्दुल याचाही लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू झाला. बोहरी मोहल्ल्यात रौदत ताहिरा दर्ग्याजवळ हा अपघात झाला. तिथे लिफ्टसह दोन कामगार खाली कोसळले आणि त्यात सय्यदचा मृत्यू झाला. दुसरा कामगार जखमी झाला आहे. त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी झालेल्या कामगाराचे नाव करिमुल तथा विपुल खान असे नाव आहे.

दोन्ही अपघातांची नोंद जेजे मार्ग पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा