मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!

सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!

मुंबई विमातळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पथकाने तब्बल २ किलोचे सोने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत पावणे दोन कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाने २ किलो ४२७ ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजाराची किंमत १ कोटी ७० लाख रुपये इतकी असल्याची माहिती आहे. याशिवाय ४२ लाखांच्या इलेक्ट्रोनिक वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये मोबाईल-टॅब्लेटचा समावेश आहे.

हे ही वाचा  : 

आसाम पोलिसांची मोठी कारवाई, ६ कोटींचे हेरॉईन जप्त!

नसीब चौधरीच्या घरावर अखेर बुलडोजर !

सोमवारी पिंपरीत होणार ब्राह्मण सामर्थ्य संमेलन

सरन्यायाधीश म्हणाले, ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली’

केनिया, जेद्दा, दुबईतून सोन्याची तस्करी होत होती. विमानांमधून येणाऱ्या काही प्रवाशांच्या हालचाली संशायास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. तपासणी दरम्यान या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या ७ जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version