नौशेरामध्ये दोन जवान हुतात्मा

नौशेरामध्ये दोन जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात दोन जवान हुतात्मा झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की नियंत्रण रेषेजवळील लँडमाइनवर लष्कराच्या गस्तीने पाऊल टाकल्यानंतर झालेल्या स्फोटात एक अधिकारी आणि एक सैनिक ठार झाले आहेत. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “दोन मृत्यू झाले आहेत. अन्य तीन जण जखमी झाले आहेत.”

वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, ज्या भागात स्फोट झाला तो भाग घुसखोरी रोखण्याच्या व्यवस्थेचा भाग म्हणून लष्कराने पेरलेल्या भूसुरुंगांनी भरलेला आहे.

हे ही वाचा:

आता काँग्रेसशी चर्चेची वेळ निघून गेली

चीनच्या नव्या कुरापती, नदी प्रदूषित करण्याचा डाव

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

नौशेरा सेक्टर हा भाग राजौरी जिल्ह्यांतर्गत येतो जो जम्मूमधील पिरपंजाल प्रदेशाचा एक भाग आहे.  जेथे गेल्या तीन आठवड्यांपासून लष्कराची कारवाई सुरू आहे. पूंछच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात दोन अधिकाऱ्यांसह नऊ जवान हुतात्मा झाले आहेत. गेल्या १८ वर्षांतील या प्रदेशातील दहशतवादविरोधी ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Exit mobile version