23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाविद्यार्थ्याच्या खिशात पोलिसांनीच ठेवले ड्रग्जचे पाकीट, उकळले ५ लाख!

विद्यार्थ्याच्या खिशात पोलिसांनीच ठेवले ड्रग्जचे पाकीट, उकळले ५ लाख!

गुन्हा दाखल, चार जणांना अटक

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन एका १९ वर्षीय विद्यार्थ्याकडून ४.९८ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे या घटनेत दोन पोलिसांचा समावेश आहे.पीडित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून देहू रोड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजवळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमर मिर्झा, शंकर गोर्डे, मुन्ना स्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (१९) असे तक्रारदाराचे नाव आहे.तक्रारदार वैभवसिंग हा मूळचा झारखंडचा असून सध्या पुण्यातील किवळे येथे राहायला आहे.तरुणाने देहू रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमर मिर्झा यांना पोलिसांनी अटक केली.

हे ही वाचा:

शंभू सीमेवर उशिरा रात्री संघर्ष; निहंगला लागली रबरी गोळी

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईच्या घरी चोरी, सहा महिन्यानंतर तक्रार दाखल!

आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!

पोलीस आयुक्त बाबू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैभवसिंग चौहान हा किवळे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. तेव्हा त्याची आरोपी अमन शेख याच्याशी ओळख झाली.आरोपी अमनने देहू रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आरोपी पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजवळ यांची मदत घेत वैभवसिंगला अंमली पदार्थ विक्रीच्या खोट्या कटात फसवण्याची योजना आखली.

त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थ्याला कॅफेमध्ये बोलावले आणि त्याच्या खिशात ड्रग्जचे पॅकेट ठेवले.त्यानंतर आरोपी पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याची तपासणी केली.त्यावेळी विद्यार्थ्याकडून ड्रग्सचे पाकीट सापडले.त्यानंतर बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ​​आरोपी पोलिसांनी २० लाख रुपयांची मागणी केली.घाबरलेल्या विद्यार्थ्याने आरोपीच्या खात्यात ४.९८ लाख रुपये ट्रान्सफर केले.

दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस देहू रोड पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच आरोपी असलेले दोन पोलीस कर्मचारी सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा