तुर्कीच्या संसदेजवळ दहशतवाद्यांकडून स्फोट !

कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती

तुर्कीच्या संसदेजवळ दहशतवाद्यांकडून स्फोट !

तुर्कीची राजधानी अंकारा येथे मोठा दहशतवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी दुपारी संसदेजवळ मोठा स्फोट झाला.तसेच परिसरात गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याचे वृत्त आहे.सध्या परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.विशेष म्हणजे संसदेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ही घटना घडली आहे.

तुर्कस्तानच्या गृह मंत्रालयाने या स्फोटाचे वर्णन ‘दहशतवादी हल्ला’ असे केले आहे.याबाबत मंत्रालयाने सांगितले की, आमच्या गृह मंत्रालयाच्या जनरल डायरेक्टर ऑफ सिक्युरिटीच्या गेटबाहेर दोन दहशतवादी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आले आणि त्यांनी स्फोट घडवून आणला.हल्लेखोर एका हलक्या व्यावसायिक वाहनातून इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर आले. एका हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले तर दुसऱ्या दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘उत्तर प्रदेशमधील चकमकी राज्य-पुरस्कृत नाहीत’

२६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा साथीदार मुफ्ती कैसर फारूक याची हत्या !

मणिपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीला एनआयएकडून अटक

वाघाच्या बदल्यात ‘नखे’!

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेले नाही.मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत.बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरु आहे.मात्र, अद्याप कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी घेतली नाही.

Exit mobile version