कल्याण आणि डोंबिवली शहरांत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बांधकामे उभे राहत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील डोंगर, पडीक- जमीनी पोखरून बांधकामासाठी दगड-मातीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अशातच डोंबिवली जवळचे संदप-भोपर या गावात खाणीच्या खोलीचा अंदाज न आल्याने येथे नागरिकांचा बुडून मृत्यू होतो. अशा घटना वारंवार येथे घडत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी करतात.
या खानी नजीकच्या परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास ६ लहान मुले देवीच्या दर्शनासाठी गेले होते. लहान मुलांना पोहण्याचा मोह आवरला नाही अशातच त्या ६ पैकी २ बालकांचा बुडून मृत्यू झाला. याच खाणीत पाच महिन्यापूर्वी पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर अग्निशमन विभागामार्फत येथे जीवन रक्षकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याबाबत अंमलबजावणी न करण्यात आल्याने आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
धनुष्यबाण गोठवल्यावर काय म्हणाले संजय राऊत?
निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
२० कोटीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या गजा मारणेच्या सदस्यांना अटक
तसेच व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी पोखरून त्यातून भरावासाठी माती-दगड काढून इतर ठेकेदाराणा विकण्यात येते. त्यामुळे या खोदकामातून मोठे खड्डे तयार झाले आहेत. कालांतराने पावसाचे पाणी भरून तिथे पाणवठे तयार झाले आहेत. मात्र उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी या खाणीच्या आजूबाजूच्या गावातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे. तसेच खाणीच्या बाजूला पालिके तर्फे दोन टाक्या बसविण्यात आले आहेत. व सुरक्षेखातर जीवन रक्षणकांची नेमणूक करण्याचे नियोजन होते. मात्र अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे जीवन रक्षक नेमले गेलेले नाहीत.