तेलंगणातील दुंडीगल येथील वायुसेना अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान सोमवारी भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) पायलटस ट्रेनर विमान कोसळले.या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.मृत वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुंडीगल एअर फोर्स अकादमीतून उड्डाण घेतलेल्या ट्रेनर विमानाचा सोमवारी सकाळी मेडक जिल्ह्यातील तूप्रन येथे अपघात झाला.”एएफएकडून नियमित प्रशिक्षण घेत असताना एका पिलाटस पीसी ७ एमके इल या ट्रेनर विमानाचा अपघात झाला.
आयएएफने या दुर्घटनेची माहिती देण्यात आली.आयएएफने दिलेल्या निवेदनानुसार, एएफए, हैदराबाद येथून नियमित प्रशिक्षणादरम्यान एका ‘Pilatus PC ७ Mk II’ विमानाला आज सकाळी अपघात झाला. हे अत्यंत खेदजनक आहे.या दुर्घटनेत दोन वैमानिकांना अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे.या अपघातात कोणत्याही नागरिकाचे किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.अपघात कसा झाला या आदेश देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा:
तेलंगणमधील पराभवाला स्वतः केसीआरच कारणीभूत
निकालाआधीच रेवंथ रेड्डी यांना भेटून पुष्पगुच्छ देणे भोवले
पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार
परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट करत वैमानिकांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.ते म्हणाले, “हैदराबादजवळ झालेल्या या अपघातामुळे दु:ख झाले आहे. दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. या दुःखद प्रसंगी, आम्ही कुटुंबासोबत आहोत.