१९९२ च्या दंगलीतील गुंगारा देणारा आरोपी तबरेज आला ताब्यात

आरोपी सापडला १८ वर्षानी

१९९२ च्या दंगलीतील गुंगारा देणारा आरोपी तबरेज आला ताब्यात

१९९२ च्या दरम्यान अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंदू-मुस्लिम समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगली घडविण्यात आल्या होत्या. या दंगलीत राजकीय पुढाऱ्यांसह त्या काळातील कुख्यात गुंडांचा सुद्धा समावेश होता. याच दंगलीशी संबंधित असणाऱ्या एका ४७ वर्षीय वेश बदलून राहणाऱ्या फरार आरोपीला तब्बल १८ वर्षानंतर अटक करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले आहे.

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तबरेज खानअली मनसूरी (४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीबद्दल दिंडोशी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी माहितीच्या आधारावर सापळा रचून आरोपी तबरेज खान याला मालाड पश्चिम येथील दिंडोशी बस डेपोच्या आगारातून शनिवारी अटक केली. आरोपी तबरेज हा दंगल झाल्यापासून तब्बल १८ वर्ष मुंबईतील उपनगरात वेगवेगळे वेश बदलून राहत होता. असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

आरोपी तबरेज खानअली याचा १९९२ च्या दंगलीत सहभाग होता. पोलिसांनी त्यावेळी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नऊ आरोपींची नावे होती. या नऊ आरोपींविरुद्ध पोलिसांनी दंगलप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी २ आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सहा आरोपी न्यायालयात हजर न झाल्याने २००४ झाली त्यांना फरार घोषित करण्यात आले व त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. दरम्यान, अटक केल्या नंतर आरोपी तबरेजची पोलिस यंत्रणा कसून चौकशी करत आहे.

Exit mobile version