त्या गाडीतील इतरांनीही विनयभंग केल्याचे महिलेचे मत

या महिलेने गाडीच्या चालकासह अन्य लोकांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप थोपवला आहे.

त्या गाडीतील इतरांनीही विनयभंग केल्याचे महिलेचे मत

रविवारी एका १० महिन्यांच्या मुलीला गाडीतून फेकण्याची घटना आणि तिच्या आईलाही गाडीतून बाहेर फेकल्याची घटना महाराष्ट्रात खळबळ उडविणारी ठरली होती. या १९ वर्षीय महिलेचा विनयभंग गाडीत करण्यात आला होता. सोनाक्षी वडके या महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे आणि गाडीच्या चालकासह अन्य लोकांनी आपला विनयभंग केल्याचा तिचा आरोप आहे. हे प्रकरण आता मीरा भायंदर वसई विरार गुन्हे शाखेकडे (एमबीवीवी) दाखल करण्यात आले आहे.

सोनाक्षी वडके ही महिला आपल्या आई-वडिलांच्या घरी वाड्याला जात होती. तिच्या सोबतीला तिची एक चिमुकली मुलगी ही होती. पेल्हार येथे तिने ही व्हॅन पकडली. ही व्हॅन वसईहून निघाली होती. तिच्या व्हॅनमध्ये बसल्यावर ती व्हॅन प्रवाशांसाठी अनेक स्टॉपवर थांबत होती. थोड्याच वेळानी ती व्हॅन भरली. थोडे अंतर पार केल्यावर चाळकेने तिचा विनयभंग केला. यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने व्हॅन मधून उडी घेतली. तिची मुलगी लावण्या तिच्या मांडीवर असल्यामुळे तीही बाहेर फेकली गेली. या अपघातात लावण्याचा मृत्यू झाला आणि सोनाक्षीला डोक्यावर गंभीर दुखापत झाली.

हे ही वाचा:

गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

त्या चालकाचे नाव विजय कुशवाह असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने बाकी प्रवाशांवर सुद्धा विनयभंगाचा आरोप केला आहे परंतु त्या प्रवाशांचा काही पत्ता नाही लागला आहे. सोनाक्षीच्या म्हणण्याप्रमाणे एका प्रवाशांनी तर लावण्याला तिच्या कडून हिसकावून घेतले होते. तथापि, कुशवाह यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबत सांगितले, ” बाळ तिच्या आईच्या मांडीवर उभे होते आणि बाहेर झुकले होते. तेव्हाच ती तिच्या मुठीतून सुटली आणि खिडकीतून पडली. घाबरून त्या महिलेने उडी मारली “. कुशवाहाच्या म्हणण्यानुसार, सोनाक्षीने तिच्या पतीला वाड्यात पोहोचण्यासाठी व्हॅन मिळाल्याबद्दल माहिती देण्यासाठी फोन केला होता. त्याने असेही सांगितले की तिने त्याला ९-अंकी क्रमांक दिला आणि बाळ पडल्यानंतर तिने त्याला तिच्या पतीचा नंबर दिला आणि त्यांना संपर्क करण्यास सांगितले.

Exit mobile version