दक्षिण मुंबईतील एका घरात चोरी करताना ६७ वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी १९ वर्षीय घरगुती नोकराला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीचा माग काढत पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.कन्हैया कुमार पंडित असे आरोपीचे नाव असून त्याला ११ मार्च रोजी नोकरीला ठेवण्यात आले होते अन दुसऱ्याच दिवशी १२ मार्चला वृद्ध महिलेची घरात हत्या झाली.मुंबई पोलिसांनी त्याला चोरीच्या मालासह अटक केली आहे.
ज्योती शहा असे मृत महिलेचे नाव असून नेपन्सी रोडवरील तहनी हाईट्स येथे ती राहत होती.मृत महिलेचा पती मुकेश हा एका दागिन्याच्या दुकानाचा मालक आहे.मुकेशने केलेल्या कॉलवर ज्योतीने उत्तर न दिल्यामुळे तिला शोधत तो घरी आला.तेव्हा त्याला ज्योती बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.तिला त्वरित नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले.
बिहारच्या दरभंगा येथील रहिवासी असणारा कन्हैया कुमार हा घटनेच्या वेळी महिलेसोबत होता आणि त्यानंतर तो बेपत्ता होता.तसेच तीन लाख किमतीच्या दोन हिऱ्याच्या व सोन्याच्या बांगड्या देखील चोरीला गेल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या वेळी कन्हैयाने महिलेचा गळा दाबला होता.
हे ही वाचा:
सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!
मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल
अक्षरधाम मंदिर दहशतावादी हल्ल्याचा सूत्रधार घोरीकडून भारताविरोधात युद्ध पुकारण्याची चिथावणी
वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय लाटकर यांनी सांगितले, जेव्हा मलबार हिल पोलिस स्टेशनचे आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा ज्येष्ठ नागरिक मृतावस्थेत आढळून आली.गळा दाबल्याच्या खुणा दिसत होत्या, तिचा पती तक्रारदार आहे.हत्येनंतर, घरातील कर्मचारी कन्हैया बेपत्ता होता, आणि तो त्यावेळी तिच्यासोबत फक्त एकटा होता.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी १५ पोलीस पथके अनेक ठिकाणी रवाना करण्यात आले.सर्व प्रमुख बसस्थानकांचा आणि रेल्वे स्थानकांचा तपास करण्यात आला.आरोपीचा फोन बंद असल्याने, त्याचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली.आरोपी रेल्वेच्या आधारे शहरातून बाहेर पडेल या शक्यतेने रेल्वे पोलिसांनाही सतर्क करण्यात आले होते.दरम्यान, आरोपी बिहारला जाण्यासाठी पहिलाच लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून ट्रेन पकडली होती.मात्र, काही तासांतच त्याला ट्रेनमधून अटक करण्यात आली.चोरीचे दागिनेही मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत.याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.