नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली माहिती

नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल

राज्यासह देशात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. पोलिसांकडून याविरोधात कारवाई सुरू असून घुसखोर नागरिकांना शोधून कारवाई केली जात आहे. हिंदुत्ववादी संघटनाही आवाज उठवत या समस्येला वाचा फोडत आहेत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. इतकेच नव्हे तर हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या मदतीने थेट सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याची प्रकरणेही समोर आली होती.

काही दिवसांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. यानंतर थेट ‘पीएम किसान सन्मान योजने’त बांगलादेशी घुसखोर लाभार्थी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासदंर्भात आकडेवारी समोर आणत दावा केला होता.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात ‘प्रधानमंत्री किसान योजने’मध्ये बांगलादेशी नागरिक लाभ घेत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. या योजनेत भादवण गावातील १८१ बांगलादेशी लाभार्थी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी आता मोठी कारवाई झाली आहे. या १८१ बांगलादेशी लाभार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या कळवण तालुक्यातील भादवण गावामधील १८१ बांगलादेशी लाभार्थींच्या विरोधात बुधवार, २६ मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम सेक्शन ४१७, ४६५, ४६८ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम सेक्शन ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर; कोणत्या भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम?

चेंबूर, गोवंडीमधून १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला लिहिले पत्र; १९७१ च्या मुक्ती युद्धाची करून दिली आठवण

वाल्मिक ‘आका’चा पाय खोलात; तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली

या संपूर्ण प्रकरणाबाबत किरीट सोमय्या यांनी कळवण पोलीस ठाण्यात ७ मार्च २०२५ रोजी तक्रार केली होती. सुक्तारा खातुन, नजमुल हक, तस्लीमा खातुन, इंताब, मोहम्मद हजरत, मोहम्मद रशिद आलम, अनिसा, अन्वरा, साहुद राजा, सलाम अली, अफीफा खातुन, इशरत जहाँ, जुलेखा बीबी, अख्तर हुसैन, मोहम्मद हनिफ, खुशबु, मोहम्मद मंजरुल आलम, ताहेर आलम, सरीना खातुन अशी ही काही बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत जे ‘प्रधानमंत्री किसान योजने’मधून लाभ घेत आहेत.

फाजिलपणा हेच पक्षकार्य ? | Mahesh Vichare | Anil Parab | Uddhav Thackeray | Sushma Andhare |

Exit mobile version