दिल्लीच्या गोविंदपुरी एक्स्टेन्शन भागामधील अवैध हुक्का बारमध्ये शनिवारी एका १७ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर, अन्य एकजण जखमी झाला. १ एप्रिलपासून बंद असलेल्या या बारमध्ये सात-आठ मित्र वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जमले होते. त्यावेळी झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसाचारात झाले.
कुणाल असे मृताचे नाव असून तो गोविंदपुरी येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. पोलिसांना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजता गोळीबार झाल्याची माहिती देणारा फोन आला होता. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या तीन मजली इमारतीत बेकायदा हुक्का जॉइंट कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
जंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे
‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव
ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केली होती एक हजार लोकांची तस्करी
बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण
‘या मुलाच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागली होती. त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले,’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, जखमी तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पार्टी सुरू असतानाच मुलाच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. तपासात या प्रकरणात स्थानिक गुंडांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. एका संशयिताची ओळख पटली आहे, मात्र तो अल्पवयीन आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. हा सात-आठ मुलांचा गट अमली पदार्थांचे सेवन करत होता का, याचा तपास पोलिस करत आहेत.