नेपाळमध्ये बस उलटून १८ प्रवाशांचा मृत्यू

तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा विविध रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

नेपाळमध्ये  बस उलटून १८ प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमधील धार्मिक समारंभातून घरी जाणाऱ्या लोकांनी खचाखच भरलेल्या बसला कावरेपालन चौकात भीषण अपघात झाला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ग्रामीण नगरपालिकेच्या चालाल गणेशस्थानातील सल्लाफेड येथे हा अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्यातील तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा विविध रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३९ प्रवासी होते.

खराब दृश्यमानतेमुळे एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या बसवर चालकाचे नियंत्रण न राहिल्याने बस पलटी उलटली असे सांगण्यात येत आहे. ही बस ७० किमी अंतरावर घाटबेसी मोड येथे बस त्रिशूली नदीत पडली. नेपाळ लष्कराच्या जवानांसह सुरक्षा दल आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी अपघातस्थळावरून जखमी प्रवाशांना नदीतून बाहेर काढले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मात्र या अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागातील रस्ते खड्डेमय रस्ते आणि अरुंद उतार आहेत त्यामुळे देखील हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’

महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर शीर मेमोरियल हॉस्पिटल आणि धुलिखेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जाजरकोट जिल्ह्यातील छेडागड नगरपालिकेतील लेवा येथे सोमवारी झालेल्या जीप अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कावरे येथे हा अपघात झाला.

Exit mobile version