मुंबईत पोलिसांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून दोन दिवसांत मोठी कारवाई केली आहे. गोवंडी, चेंबूरमध्ये १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात तृतीयपंथीयांचाही समावेश असल्याची माहिती आहे. हे बांगलादेशी नागरिक मागील पाच ते सहा वर्षांपासून शिवाजी नगर गोवंडी येथे राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबईसह राज्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरू आहे. गोवंडी परिसरात काही बांगलादेशी घुसखोर तृतीयपंथी अवैधरीत्या वास्तव्यास असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली. शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत कारवाई करत आठ तृतीयपंथी बांगलादेशींसह एकूण १७ बांगलादेशींना अटक केली आहे. गोवंडी, चेंबूर भागात ही कारवाई करण्यात आली. यात आठ बांगलादेशी तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्या एका कारवाईत आरसीएफ पोलिसांनी चार पुरुष आणि पाच महिला अशा नऊ घुसखोर बांगलादेशींना अटक केली.
बैसाखी एमडी शहाबुद्दीन खान (२४, ढाका), मो. रिदोय मिया पाखी (२५, किशोर गंज), मारूफ इकबाल ढाली (१८, ढाका), शांताकांत ओहीत खान (२०, ढाका), बर्षा कोबीर खान (२२, नारायण गंज), मो. अफजल मोजनूर हुसेन (२२, किशोर गंज), मिझानुर इब्राहिम कोलील (२१, किशोर गंज), शहादत आमिर खान (२०, रूप गंज) ही शिवाजी नगर पोलिसांनी रफिक नगर येथून अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशी तृतीयपंथीयांची नावे आहेत. हे आठही तृतीयपंथी रफिक नगर येथील भारतीय तृतीयपंथीयांसोबत मागील काही वर्षांपासून राहत होते.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला लिहिले पत्र; १९७१ च्या मुक्ती युद्धाची करून दिली आठवण
वाल्मिक ‘आका’चा पाय खोलात; तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली
दिशा सालीयनच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर
कोरटकर सापडला बातमी मात्र फरार !
दरम्यान, आरसीएफ पोलिसांनी मामुन मातुरेहमान जम्मातदार (२७, ब्राम्हणबरिया), आसिबुल अकबर मुल्ला (३०, नोराईल), मेहंदी रफिक खान (३८, माणिक गंज), नूर मतलब शेख (३९, ढाका), रुबीना उर्फ रेश्मा असीबुल मुल्ला (३२, माघुरा) सुर्वी अख्तर कुकोण मियां (१९, जिमलपूर), तानिया अख्तर मीम उर्फ माही खान (२०, जिमलपूर), शहारीया अख्तर मेघला (२०, खुलना), सादिया इस्लाम मिम (२५, नारायण गंज) या नऊ जणांना माहुलगाव, चेंबूर येथून अटक करण्यात आली. हे नऊ जण २०२३ मध्ये भारतात घुसखोरी करून आले होते.