बालसुधारगृहात १६ वर्षांच्या मुलाची हत्या केली त्याच्यापेक्षा लहान मुलांनी

चार मुलांना केली अटक

बालसुधारगृहात १६ वर्षांच्या मुलाची हत्या केली त्याच्यापेक्षा लहान मुलांनी

माटुंग्यातील डेव्हिड ससून औद्योगिक बालसुधारगृहात १६ वर्षीय मुलाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. या हत्येमुळे डेव्हिड ससून बालसुधारगृहात असणाऱ्या विधीसंघर्ष बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चार विधिसंघर्ष बालकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांमध्ये एक जण १२ वर्षाचा असून इतर तिघे १५ ते १६ वर्षाचे आहेत. डी.बी.मार्ग पोलिसांना ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवर १६ वर्षाचा मुलगा भरकटलेल्या अवस्थेत मिळून आला होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली मात्र तो पोलिसांच्या प्रश्नाचे उत्तर देत नसल्यामुळे त्याला सुरक्षेच्या दृष्टीने बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. बाल कल्याण समिती डोंगरी यांनी या मुलाची रवानगी माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक बालसुधारगृह येथे ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘ध्येयपूर्ती’साठी भाजपाचा शनिवारी माटुंग्यात मेळावा

‘राणा’ तुला अखेरचा सलाम; तुझे उपकार विसरता येणार नाहीत

तुमच्या आशीर्वादाने फोडू महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी

नितीन गडकरींनी का घेतली अमिताभ बच्चन यांची भेट?

 

या मुलांच्या आई वडिलांचा शोध घेण्यात येत होता, तोपर्यत त्याला विलीगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत तेथील कर्मचारी यांना आढळून आला, त्याला तात्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत बालसुधारगृहतील अधिकारी यांनी शिवाजी पार्क पोलिसांना कळविले.

पोलिसांनी प्रथम अपमृत्युची नोंद करून सुधारगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात बालसुधार गृहात असलेले चार विधीसंघर्ष बालकांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे आढळून आले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीसानी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version