26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामासॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार...

सॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार कोटींचा घोटाळा

५ कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी १ कोटी ९ लाख १९ २६४ रु. एवढी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेसच्या नावे

Google News Follow

Related

अज्ञात व्यक्तिने Safexpay out कंपनीचे Software हॅक करुन २५ कोटी रुपयांचा फ्रॅाड केल्याने Safexpay कंपनीच्या लीगल ऍडवाइजर मनाली साठे यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 148/2023 भादवि कलम 420, 409, 120(ब), 34 सह आय.टी. ऍक्ट 65, 66(क), 66(ड) अन्वये नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर सेल ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

 

 

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना असे आढळून आले की, वरील नमूद २५ कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी १ कोटी ९ लाख १९ २६४ रु. एवढी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेसच्या नावे असलेल्या HDFC बॅंक खातेमध्ये वळती झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. रियाल इंटरप्राइजेसच्या गोपनीय माहितीवरुन तपास केला असता त्यांचे कार्यालय वाशी व बेलापूर, नवी मुंबई येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.

 

 

रियाल इंटरप्राईजेस यांच्या वाशी व बेलापूर येथील कार्यालयात जाऊन तपास केला असता सदर ठिकाणी विविध बँक खाते व विविध करारनामे प्राप्त करण्यात आले. प्राप्त करारनाम्यापैकी नौपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये बालगणेश टावर स्टेशन रोड ठाणे या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे पाच भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

 

रियाल कंपनीचे कामगार यांचेकडे तपास करत असतांना जवळपास २६० बॅंक खाते व विविध नोटराईज्ड भागीदारी करारनामे आढळून आले. सदर बॅंक खातेबाबत माहीती प्राप्त केली असता त्यामध्ये अंदाजे १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७) रूपयांची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले .तसेच सदर रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठविल्याचे दिसून आले आहे. सदर बाबतची माहिती डीजी इन्वेस्टीगेशन ,मुंबई यांना देण्यात आलेली आहे.

 

 

अशा प्रकारे विविध नोंदणीरहित भागीदारी फर्मचे नावे विविध इसमांचे नावे बॅंक खाती उघडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याने आरोपीनामे संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमन, केदार उर्फ समीर दिघे, जितेंद्र पांडे, नविन व इतर यांचे विरोधात सदर प्रकरणी शासनातर्फे नौपाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं 294/2023 भा.द.वि.क. 420, 409, 467, 468, 120(ब), 34 सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66(सी), 66(डी) प्रमाणे स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

 

हे ही वाचा:

इस्त्रायल- पॅलेस्टिन संघर्षामध्ये अमेरिका इस्रायलच्या बाजूने मैदानात

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; तारखा जाहीर

सोमवारी सुनावणी, अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करा!

भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय

 

काही न्युज ग्रुप मध्ये  १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ इतक्या रकमेचा सायबर fraud बद्दल नमूद आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सदर रक्कम ही विविध खात्यांमधील उलाढालींची रक्कम असल्याचे दिसून येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा