पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!

बलूच लिबरेशन आर्मीने घेतली हल्ल्याची जबाबदारी

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!

पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमी बलुचिस्तान क्षेत्रात सोमवारी रात्री उशिरा फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या गटाने केलेल्या हल्ल्यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला.पाकिस्तान लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स एजन्सीने (आयएसपीआर) दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बलूचिस्तानच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील माच आणि कोलपूर परिसरात हल्ला केला. हल्ल्यानंतर आसपासच्या परिसरात सुरक्षारक्षकांना तातडीने तैनात करण्यात आले.

बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. खनिजांनी समृद्ध असा बलुचिस्तान भाग स्वतंत्र व्हावा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा परंतु अत्यंत कमी लोकसंख्येचा भाग आहे.

हे ही वाचा:

तामिळनाडू सरकारने २२ जानेवारीला फक्त चार धार्मिक कार्यक्रमांना दिली परवानगी!

शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन

छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!

महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश!

बंडखोरांनी माच तुरुंगाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे डागली. मात्र ते सुरक्षाव्यवस्था भेदू शकले नाहीत. ही क्षेपणास्त्रे माच तुरुंगातील निवासी इमारतींवर जाऊन धडकली. त्यानंतर अनेक स्फोट झाले. या तुरुंगात अनेक दहशतवादी आणि कैद्यांना ठेवले गेले आहे, त्यापैकी अनेकांना मृत्युदंड सुनावण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात पाच दहशतवादी ठार झाले आहेत.

सशस्त्र दहशतवादी आणि लष्करादरम्यान कित्येक तास गोळीबार झाला. त्यानंतर सूर्योदयापूर्वी ते डोंगराळ भागात पळून गेले. प्रतिबंधित बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)च्या माजिद ब्रिगेड याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Exit mobile version