कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील त्याच्या गाझीपूर येथील घराजवळ गर्दी जमत असल्याचे चित्र आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक जमू लागल्याने शांतता आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी हा तुरुंगात होता आणि त्याचा तीव्र हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला तातडीने बांदा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला.
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूमुळे, राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश उद्भवू नये उत्तर प्रदेश पोलीस सतर्क झाले आहेत. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू केले आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून बांदा, मऊ, गाझीपूर आणि वाराणसीमध्ये स्थानिक पोलिसांसह केंद्रीय पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू
शिवसेनेची यादी जाहीर; शेवाळे, बारणे, मंडलिक यांना उमेदवारी
मुंबई इंडियन्सला सचिन तेंडुलकरचा गुरुमंत्र
पूर्व उत्तर प्रदेशच्या मऊचे पाच वेळा आमदार राहिलेला मुख्तार हा मालमत्तेच्या व्यवसायात होता. उत्तर प्रदेश आणि इतर अनेक ठिकाणी जवळपास ५२ गुन्हेगारी प्रकरणांमध्येही त्याचा सहभाग होता. २०१७ मध्ये त्याने अखेरची विधानसभा निवडणूक लढवली होती.