थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!

बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!

थायलंडमध्ये बसचे नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.थायलंडच्या प्रचुआप खीरी खान प्रांत येथे मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान हा बघत झाला.घटनास्थळी बचावकर्ते प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करत होते.

थाईपीबीएसने दिलेल्या माहितीनुसार, अपघात एवढा भीषण होता की, बस पुढील निम्मा भाग विभागाला गेला.बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.ही बस बँकॉकहून सोंगखला प्रांतातील नथवी जिल्ह्यात जात असताना हा अपघात झाला.

हे ही वाचा:

शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वर्षभरात ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त

द. आफ्रिकेच्या संघाची घोषणा; टेंबा बावुमाला कर्णधारपदावरून हटवले

नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब

या घटनेनंतर परिवहन कंपनीने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केले.निवेदनात म्हटले आहे की, एका बसचे नियंत्रण सुटले आणि बस झाडावर आदळली.या दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले.मध्यरात्री साडेबारा वाजता देशाच्या पश्चिमेकडील प्रचुआप खीरी खान प्रांतात ही घटना घडली.अपघाताच्या कारणाचा तपास पोलीस अधिकरी करत आहेत.

 

 

Exit mobile version