बांग्लादेशात कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर हिंदू मंदिरे

बांगलादेश सरकारचे पूर्ण दुर्लक्ष

बांग्लादेशात कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर हिंदू मंदिरे

बांग्लादेशात पुन्हा एकदा अज्ञातांनी रात्री उशिरा अनेक मंदिरांवर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे, असे पूजा उत्सव परिषदेचे सरचिटणीस विद्यानाथ बर्मन यांनी सांगितले. बांग्लादेशात परत एकदा हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. चार फेब्रुवारीच्या रात्री उशिरा एक दोन नाही तर चक्क १४ मंदिरांची तोडफोड केली आहे. ही घटना ठाकूरगाव जिल्ह्यातील बलियाडांगी या उपजिल्ह्यात घडली आहे. अनेक मंदिरात मोडकळीस आलेल्या मूर्त्या पाहून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पूजा उत्सव परिषदेचे सरचिटणीस विद्यानाथ बर्मन यांनी सांगितले की, ही रात्री घटना घडली असून आजूबाजूच्या गावातील अनेक मंदिरांवर हल्लेखोरांनी  हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी काही मूर्ती तोडून  तलावात फेकून दिल्या आहेत. हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. या आधीही हिंदूंच्या अनेक धार्मिक स्थळांवर हल्ले झाले आहेत. कट्टरतावादी सातत्याने अशा घटना घडवून आणत आहेत. मात्र तेथील सरकारने त्यावर अद्याप कोणतीच ठोस कारवाई केली नाही. त्यामुळेच हिंदूंच्या धार्मिक स्थळांना रोज लक्ष केले जात आहे.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

या भांडण प्रकरणाचा संपूर्ण तपास करणारे पोलीस अधिकारी खैरुल अनाम यांनी सांगितले की, चार फेब्रुवारीच्या रात्री अनेक गावातील मंदिरांवर हल्ले झाले आहेत. परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पूर्ण शोध घेत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

जिल्ह्याचे उपायुक्त एम रहमान म्हणाले की, शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. याची गांभीर्याने दाखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. समर चॅटर्जी , हिंदू नेते, आणि परिषदेचे अध्यक्ष म्हणाले की, या भागात हिंदू मुस्लिम बंधुभाव आहे. आम्ही तुमच्याशी कधीच भांडत नाहीत. आपण सर्व शांततेत राहतो दोन समुदायांमध्ये कोणताच वाद नसल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version