बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती. तर, त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या घटनेतील तीनही आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार होते आणि त्यांचा शोध घेतला जात होता. यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या आरोपींचा समावेश आहे. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या दोन मुख्य आरोपींसह, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता, अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंटचे आयोजन
विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
सांगलीच्या श्रीराम मंदिर चौकात १०० फुटी भगवा ध्वज उभारणार
फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू
आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी यावेळी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून न्यायालयात करण्यात आली. हे टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येकडे त्यांनी मजा म्हणून पाहिले आहे. या आरोपींना आळा घालण्यासाठी आणि तपासासाठी आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडली सुनावली आहे.