चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जामीनाचा मार्ग मोकळा पण, इतर दाखल गुन्ह्यात होणार चौकशी

चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आरोपी विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, सुरेंद्र कुमार अग्रवाल यालाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे, यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी विशाल अग्रवाल याला जामीन मिळाल्यानंतरही पोलिस चौकशीसाठी त्याचा ताबा घेतला जाऊ शकतो.

आजोबा सुरेंद्रकुमारने चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

हे ही वाचा:

लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं

पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर, या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत गेली. आरोपी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांस आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता दोघेही जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतील. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याच्या प्रकरणात पुणे पोलिस विशाल अग्रवालचा पुन्हा एकदा चौकशीसाठी ताबा घेऊ शकतात, अशी माहिती आहे.

Exit mobile version