दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद अन्सार जो या हिंसाचाराचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार असल्याचे सांगितले जात असून त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या अस्लमलाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत आठ पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण नऊजण जखमी झाले आहेत.
मोहम्मद अन्सार (३५) हा अलाउद्दीन यांचा मुलगा असून तो जहांगीरपुरीच्या बी ब्लॉकचा रहिवासी आहे. याआधीही अन्सारीचा मारहाणीच्या दोन गुन्ह्यांमध्ये सहभाग समोर आला असून, त्यात त्यावेळी अटकही करण्यात आली होती. अन्सारीवर दिल्ली पोलिसांनी २००९ साली अहवाल तयार केला होता. त्या अहवालानुसार, त्याच्यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात त्याला चाकूसह अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्याचे कलम लावण्यात आले होते. त्याचवेळी, दुसरे प्रकरण जुलै २०१८ चे आहे. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे कलम त्याच्यावर लावण्यात आले होते.
हे ही वाचा:
जेम्स लेन म्हणतो, मी बाबासाहेब पुरंदरेंशी कधीही बोललो नाही!
पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी
‘जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात’
शरद पवारांचा खोटारडेपणा उघड; तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई होणार का?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीची शोभायात्रा ही शांततेत सुरू होती, संध्याकाळी ६ वाजता शोभायात्रा सी-ब्लॉक जामा मशिदीजवळ पोहोचली तेव्हा अन्सारी ४ ते ५ लोकांसह तिथे आला आणि शोभायात्रेतील लोकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. त्यामुळे शोभायात्रेत चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर जमावाने तलवारदेखील दाखवली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.