मित्राला भेटण्यासाठी मुंबईला जात असलेल्या १४ वर्षीय मुलीला पुणे रेल्वे स्थानकाहून घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाने अपहरण करून आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील आठ आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली होती आणि पुढील तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. एकूण १३ जणांनी तिच्यावर निर्जनस्थळी, जंगलात, लॉज आणि रेल्वे कार्यालय अशा ठिकाणी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीराअली उर्फ मीरा अजीज शेख, शाहुजर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद, समीर मेहबूब शेख, फिरोज उर्फ शाहरुख साहेबलाल शेख, मेहबूब उर्फ गौस सत्तार शेख यांच्यासह महंमद उर्फ गोलू मोज्जाम आलम यांना अटक करण्यात आली आहे. महंमद उर्फ गोलू हा मुलीचा मित्र असून त्यानेच फूस लावून मुलीला बोलावले म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे. याआधी आठ आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?
अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार
संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री
बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ
३१ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहारच्या मित्राला भेटायला घरच्यांना न कळवताच निघाली होती. तो मित्र आलाच नाही आणि कोणतीही रेल्वे नसल्यामुळे ती स्थानक परिसरात एकटीच फिरत होती. तेव्हा एका रिक्षाचालकाने तिला तिची रात्रीची राहण्याची सोय करून सकाळी रेल्वेत बसवून देतो असे सांगून तिला अजून रिक्षाचालक मित्राच्या मदतीने लॉजवर नेले. तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार करून अजून दोन रिक्षाचालकांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कोणाला सांगितल्यास आई- वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या दिवशी इतर आरोपींच्या ताब्यात तिला देण्यात आले. १३ नराधमांनी तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले. त्यानंतर काही पैसे देऊन तिला मुंबईला पाठवण्यात आले.
मुलीच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. त्या तपासादरम्यान पोलिस मुलीचा शोध घेत मुंबईला आले; पण तोपर्यंत ती तिचा मोबाईल बंद करून चंदीगडला मित्रासोबत निघून गेली होती. तिच्यासोबत घडलेल्या प्रकरणाची माहिती तिने सोबत असलेल्या मित्रालाही दिली नाही. पोलिसांनी मुलीला चंडीगडहून ताब्यात घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.