न्यूयॉर्क सबवे स्टेशनवर गोळीबार, १३ जखमी

न्यूयॉर्क सबवे स्टेशनवर गोळीबार, १३ जखमी

मंगळवारी, १२ एप्रिल रोजी न्यूयॉर्कमध्ये अनेकांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन सबवे स्टेशनवर ही घटना घडली आहे. परदेशी मीडियाच्या वृत्तानुसार या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जबरदस्त गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. येथील बुक्रालिन सबवे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार झाल्यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गोळीबारात १३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे. अमेरिकेतील या घटनेवर भारताचे परराष्ट्र मंत्रालय ही लक्ष ठेवून आहे.

बहुतेक लोक आपापल्या कामासाठी जात असताना सबवे स्टेशनवर गोळीबार झाला आणि तिथे आधीच खूप गर्दी होती. त्यामुळेच या गोळीबारात आणखी लोक अडकले. गोळीबाराच्या या घटनेनंतर न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्या संशयिताने गॅस मास्क घातलेला होता आणि त्याने सफाई कामगाराचे कपडे घातले होते, असे सांगण्यात येत आहे.

गोळीबारानंतर सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेनंतर संपूर्ण शहरात सतर्कतेचा इशारा देत इतर मेट्रो स्थानकेही न्यूयॉर्कमध्ये बंद करण्यात आली आहेत. आता स्थानिक प्रशासनाने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती दिली आहे आणि व्हाईट हाऊस शहराच्या महापौरांकडून याबद्दल सतत अपडेट घेत आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील लीपिकाला गाडीने उडवले

संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना

श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

मुंबईत १० कोटींचा ड्रग्स जप्त, दोन नायजेरियन अटकेत

न्यू यॉर्क शहर अग्निशमन विभागाने सांगितले की, अग्निशामक दलाला सनसेट पार्कजवळील ३६ स्ट्रीट स्टेशनमधून धुराचा अहवाल मिळाला आहे. घटनास्थळी अनेकांना गोळ्या लागल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळावरील फोटोंमध्ये स्टेशनच्या मजल्यावर रक्ताने माखलेले लोक दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ५ जणांना गोळ्या लागल्या असून १३ जण जखमी झाले आहेत

Exit mobile version