28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामामणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार, १३ जणांचा मृत्यू!

मणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार, १३ जणांचा मृत्यू!

मणिपूर सरकारकडून राज्यातील काही भाग वगळता १८ डिसेंबरपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत

Google News Follow

Related

मणिपूरमध्ये सोमवारी दुपारी उसळलेल्या हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारच्या सुमारास मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्यातील सैबोलजवळील लेथिथू गावात दहशतवाद्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला.

मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागात गेल्या सात महिन्यापासून इंटरनेट सेवा बंद केली होती, ती सरकारने रविवारी हटवली.इंटरनेटवरील बंदी उठवताच हिंसाचाराची ही ताजी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, २९ नोव्हेंबर रोजी मैतेई समाजातील युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) या दहशदवादी गटाने भर सरकार सोबत शांततेच्या करारावर स्वाक्षरी करत हिंसाचार सोडण्याचे मान्य केले.३ डिसेंबर रोजी मणिपूर राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यातील कुकी-झो या आदिवासी गटाने या कराराचे स्वागत देखील केले होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या परंपरेचा विचार करणारे क्रांतिकारी शासन आले आहे!

झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या बिर्याणीत सापडला मृत सरडा!

महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!

माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वात जवळचे सुरक्षा दल या ठिकाण्यापासून सुमारे १० किमी दूर होते.आमचे सैन्य पुढे सरकत घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सैन्याला लेथिथू गावात १३ मृतदेह सापडले.मृतदेहाजवळ कोणतेही शस्त्रे आढळून आली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला जे मृतदेह सापडले आहेत ते लेथिथू परिसरातील नसून ते दुसऱ्या ठिकाणावरून आणले असावे असे दिसत आहे.पोलिसांनी किंवा सुरक्षा दलांनी मृत व्यक्तींची पुष्टी केली नाही.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, ३ मे पासून मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजामध्ये जातीय संघर्ष सुरु झाला. या संघर्षामध्ये किमान १८२ लोक मारेल गेले असून सुमारे ५०,००० लोक वेघर झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा