प. बंगालमध्ये साधूंना मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक

प्रकरणाचा अद्याप तपास सुरू

प. बंगालमध्ये साधूंना मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशच्या तीन साधुंना मारहाण झाल्याची धक्कदायक घटना घडली. साधूंना अपहरणकर्ते समजून स्थानिकांनी त्यांना मारहाण केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला पोलिसांनी जमावापासून साधुंची सुटका केली. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील तीन साधू गंगासागर मेळाव्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जात होते. यावेळी ते अपहरण करण्यासाठी आलेत अशा संशयाने त्यांना स्थानिकांनी मारहाण केली होती. पश्चिम बंगालच्या पुरुलीया जिल्ह्यामध्ये साधूंना मारहाण झाली होती. साधू आणि त्याचे दोन मुलं एका खासगी वाहनातून मकर संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गंगासागार यात्रेला निघाले होते. यावरुन राजकीय वातावरण देखील तापले आहे. भाजपाने यावरुन तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करुन घेण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. साधूंना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरावर छापा देखील टाकण्यात आला आहे. साधूंवर हल्ला करणाऱ्या १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. याशिवाय या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

साधूंचा रस्ता चुकला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मुलींना मार्ग विचारला. मुली घाबरल्या आणि पळू लागल्या. मुलींचे अपहरण करण्यासाठी ते आलेत या शंकेतून स्थानिकांनी साधूंना मारहाण केली. या घटनेनंतर साधूंना गंगासागर यात्रेला जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा करून देण्यात आली, असंही पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

रामाचा वनवास म्हणजे सामाजिक एकात्मतेचे एक अद्वितीय उदाहरण

प. बंगालच्या पुरुलियामधील साधूंवरील हल्ला पालघरच्या हत्याकांडासारखा

अरविंद केजरीवालांना ईडीचं चौथं समन्स

संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

प्रकरण काय?

माहितीनुसार, या साधूंनी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तीन मुलींना रस्ता विचारला. यावेळी त्यांची भाषा या मुलींना समजली नाही आणि त्यांचा गैरसमज झाला. या तीन मुली अचानक ओरडल्या आणि पळायला लागल्या. हे पाहताच उपस्थित स्थानिकांनी या साधूंची गाडी अडवली आणि त्यांना गाडीबाहेर उतरवून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली आणि साधूंना कासीपूर पोलीस ठाण्यात नेले.

Exit mobile version