एसी लोकलमध्ये ११ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक

एसी लोकलमध्ये ११ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक

मध्य रेल्वेच्या एसी लोकल ट्रेनमधून आई सोबत प्रवास करणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री कळवा ते मुंब्रा दरम्यान घडली. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को,आणि भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदे यांनी दिली.  

कृष्ण रुपसिंग राठोड (२४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो मुंब्रा येथे राहण्यास आहे. डोंबिवली पूर्व येथे राहणारी ११ वर्षाची पीडित मुलगी ही आईसोबत शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी ते डोंबिवली असा एसी ट्रेनमधून प्रवास करीत होते.त्याच ट्रेनमधून मुंब्रा येथे राहणारा आरोपी कृष्णा राठोड राठोड हा प्रवास करीत होता.    

आरोपी हा पीडित मुलीकडे बघून अश्लील हावभाव करून तीला अश्लील इशारे करीत असल्याचे पीडित मुलीच्या लक्षात आले,मात्र तीने त्याकडे दुर्लक्ष करून देखील त्याचे अश्लील चाळे बंद न झाल्यामुळे पीडितेने हा प्रकार सोबत असलेल्या आईच्या लक्षात आणून दिला. आईने याबाबत त्याला जाब विचारताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर प्रवाशानी त्याला पकडून डोंबिवली रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.  

हे ही वाचा:

राष्ट्रवादीत फुटीचे कारण म्हणजे ईडीची कारवाई, शरद पवार !

शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !

सहा वर्षांत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली

समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे नव्हे !

डोंबिवली रेल्वे पोलिसानी या प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करून सदर प्रकार ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा ठाणे रेल्वे पोलीसठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी आरोपी कृष्णा राठोड याला अटक करून चौकशी केली असता तो एसी लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करीत होता अशी माहिती वपोनि.कांदे यांनी दिली,याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे कांदे यांनी सांगितले.

Exit mobile version