29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामामौलवीकडून ११ वर्षीय मुलीवर तीन महिने अत्याचार!

मौलवीकडून ११ वर्षीय मुलीवर तीन महिने अत्याचार!

बीड मधील घटना, मौलवीला अटक

Google News Follow

Related

देशासह राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बदलापूरमध्ये नुकतेच चार वर्षीय दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेवरून राज्यभरात संतापाची लाट आहे. याचदरम्यान आणखी एका ११ वर्षीय मुलीवर मौलवीकडून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रियाज शेख असे आरोपीचे नाव असून त्याला पेठ बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील मोमीन पुरा भागात राहणारा आरोपी मौलवी स्वतःच्या राहत्या घरी उर्दू व अरबी भाषेची शिकवणी घेतो. याच क्लासमध्ये शिकणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीवर सतत तीन महिने अत्याचार केल्याची माहिती समोर आहे. पिडीत मुलीने सततच्या अत्याचारला कंटाळून आपल्या आई वडिलांना याची माहिती दिली. शिक्षकाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना समजताच आई-वडिलांना एका मोठा धक्का बसला.

यानंतर आई-वडिलांनी तात्काळ पेठ बीड पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पेठ बीड पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपी मौलवीला अटक केली. आरोपी रियाज शेख हा एका उर्दू शाळेवर शिक्षक असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा :

डीएमकेचे माजी नेते जाफर सादिक यांचा बंगला, हॉटेल, महागड्या गाड्या जप्त !

‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’

कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांकडे सूत्रे !

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा