28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाआईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!

आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!

बोरिवलीतील घटना

Google News Follow

Related

अकरा वर्षाच्या मुलीचा गळा आवळून ४६ वर्षीय आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बोरिवली पूर्व येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.कस्तुरबा मार्ग पोलिसांनी महिलेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहे.

रेखा सोलंकी असे आईचे नाव असून रुहानी सोलंकी (११) मृत मुलीचे नाव आहे. बोरिवली पूर्व येथे राहणाऱ्या या मायलेकी शुक्रवारी जखमी अवस्थेत राहत्या घरात शेजारच्याना आढळून आल्या. या घटनेची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मायलेकिना उपचारासाठी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी रुहानीला तपासून मृत घोषित करून आई रेखा हिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

‘ती माझी चूक होती’

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा हीच्या हाताला कापल्याच्या जखमा असून रुहानी हिची गळा आवळून हत्या केली गेली आहे, प्राथमिक चौकशीत आई रेखा हिने रुहानीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतःही हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी कस्तुरबामार्ग पोलिसांनी आई रेखा विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा