अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात हा दहशतवादी हल्ला झाला.एका सरकारी इमारतीचे बांधकाम करण्याऱ्या ११ मजुरांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी आणि तीन जण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री उशिरा शवाल तहसीलमधील गुल मीर कोटजवळ १६ मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाजवळ स्फोट घडवून वाहन उडवल्याचे उत्तर वझिरीस्तानचे उपायुक्त रेहान गुल खट्टक यांनी सांगितले.या स्फोटात ११ मजूर जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आणि तीन बेपत्ता झाले, असे खटक यांनी सांगितले.स्फोटात मृत्यू झालेले हे दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील माकिन आणि वाना या तहसीलमधील असून मृतदेह जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.तसेच जखमींवर उपचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले. बेपत्ता कामगारांची ओळख पटवण्याचे आणि शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
फक्त २५ किमी; चंद्राच्या सर्वांत जवळच्या कक्षेत पोहोचले लँडर विक्रम
सनी देओलच्या जुहू बंगल्याचा होणार लिलाव !
समान नागरी कायद्यातील ही एक दुर्लक्षित घटनात्मक तरतूद
दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !
पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी निष्पाप मजुरांचा जीव गेल्याने या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे.त्यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले की, “उत्तर वझिरीस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल जाणून घेणे हृदयद्रावक आहे ज्यात ११ निष्पाप मजुरांचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या या मूर्खपणाच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडित कुटुंबांसोबत एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.