हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले

हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले

मृतांच्या कुटूंबियांना पीएम मोदींनी दिली दोन लाखांची भरपाई

हैदराबादमधील भोईगुडा येथे आज सकाळी लोखंड आणि प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या भीषण आगीत अकरा मजूर जिवंत जाळून खाक झाले. हे सर्व मजूर बिहारचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीषण घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अकरा जणांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून या भरपाईची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ” हैदराबादच्या भोईगुडा येथे लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबांसोबत आम्ही आहोत. मृतांच्या नातेवाइकांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ”

सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळील दाट लोकवस्तीच्या निवासी वसाहतीत तेरा कामगार गोदामाच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. सकाळी सुमारे ४ च्या सुमारास गोदामाला आग लागली आणि काही क्षणातच ह्या आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी सकाळी सातच्या सुमारास आग आटोक्यात आणली.

हे ही वाचा:

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’

ट्राउझरमध्ये लपवले होते ३ हजार हिरे

इम्रान खान का आहेत मोदींच्या प्रेमात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ” तेरा कामगारांपैकी अकरा कामगारांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. एक कामगार खिडकीतून बाहेर पडला, मात्र त्याचीही स्थिती गंभीर आहे. आणि त्याला तात्काळ गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि अजूनतरी एका कामगाराचा शोध सुरु आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक तपासात अंदाज आहे. घटनास्थळी पुढील अधिक तपास सुरु आहे. “

Exit mobile version