दक्षिण आफ्रिकेच्या खाणीत लिफ्ट ६५० फूट खाली घसरल्याने ११ दगावले!

अपघातात ७५ जण जखमी

दक्षिण आफ्रिकेच्या खाणीत लिफ्ट ६५० फूट खाली घसरल्याने ११ दगावले!

दक्षिण आफ्रिकेतील प्लॅटिनम खाणीत कामगारांना काम करण्यासाठी घेऊन जात असताना एक लिफ्ट अचानक सुमारे २०० मीटर (६५६फूट) खाली घसरली.या घटनेत ११ कामगार ठार झाले असून ७५ जण जखमी झाले आहेत, असे खाण ऑपरेटरने मंगळवारी सांगितले.

उत्तरेकडील रस्टेनबर्ग शहरातील एका खाणीत कामगारांची शिफ्ट संपत असताना सोमवारी संध्याकाळी हा अपघात झाला.जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक

इम्पाला प्लॅटिनम होल्डिंग्जचे (इम्प्लॅट्स) सीईओ निको म्युलर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “इम्प्लॅट्सच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस” होता. त्यात म्हटले आहे की, लिफ्ट कशामुळे खाली पडली याचा तपास सुरु आहे.घटनेनंतर मंगळवारी सर्व कामकाज स्थगित केल्याचे निको म्युलर यांनी निवेदनात म्हटले आहे.इम्प्लॅट्सचे प्रवक्ते जोहान थेरॉन यांनी सांगितले की, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी काही कामगार गंभीर स्वरूपात फ्रॅक्चर झाले.प्राथमिक अंदाजानुसार लिफ्ट शाफ्टमधून अंदाजे २०० मीटर खाली गेली, ते पुढे म्हणाले.ते म्हणाले की, हा एक अत्यंत असामान्य अपघात होता.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वात मोठा प्लॅटिनम उत्पादक देश आहे. २०२२ मध्ये देशातील सर्व खाण अपघातांमध्ये ४९ मृत्यू झाले होते, जे मागील वर्षी ७४ वरून कमी झाले आहे.दक्षिण आफ्रिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकेत खाण अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या दरात घट झाली आहे.

 

Exit mobile version