बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

एन. व्ही. रामण्णा यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.

बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडण्याच्या गुजरात सरकारने दिलेल्या माफीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एन.व्ही रामण्णा यांनी या प्रकरणी विचार करणार असल्याचं म्हटलं आहे.

गुजरातच्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्व ११ आरोपींना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे. गुजरातमधील भाजपा सरकारच्या शिक्षा माफ करण्याच्या धोरणाअंतर्गत सर्व आरोपींना सोडण्यात आले आहे. वकील अपर्णा भट यांनी आज, २३ ऑगस्टला सकाळी सरन्यायाधीशांसमोर या प्रकरणाचा उल्लेख करून बुधवारी तातडीने सुनावणीची मागणी केली. एन. व्ही. रामण्णा यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.

हे ही वाचा:

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

सातव्या थरावरून पडून मुंबईच्या गोविंदाचा मृत्यू

२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यांना आग लागून ५९ कारसेवक मरण पावले होते. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल पसरली होती. सुमारे महिनाभर चाललेल्या दंगलीत २ हजाराहून अधिक मुस्लिम मारले गेले होते. या दंगलीत जमावापासून लपण्यासाठी पाच महिन्यांची गर्भवती असलेली बिल्कीस बानो आपली मुलगी व १५ सदस्य असलेल्या कुटुंबासह दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यात गेली असता २०-३० संख्येच्या जमावाने त्यांच्या कुटुंबाला रोखले. आणि बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार केला व नंतर जमावाने बानोच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांना ठार मारले. २००४ साली या आरोपींना अटक करण्यात आली होती. तर २००८ मध्ये या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती.

Exit mobile version