विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारी घटनांमुळे सध्या चर्चेत आहे. कोयता गँग, अपहरण, मारहाण आणि हत्या अशा विविध घटना पुण्यातून वारंवार समोर येत आहेत. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुपारी देणारा दुसरा कोणी नसून विद्यार्थिनीच्या वर्गातीलच विद्यार्थी असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दौंडमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला दिली होती. याचा राग मनात घेवून विद्यार्थ्याने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यासाठी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी दिली.
हे ही वाचा :
मजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख
त्रिपुरात ५ दिवसांत १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, तस्करही ताब्यात!
झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक; तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
मात्र, त्या विद्यार्थ्याने ही सर्व माहिती पिडीत विद्यार्थिनीला दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. याबाबत पिडीत विद्यार्थिनीच्या पालकांनी वर्गशिक्षक, मुख्याध्यापकांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. प्रकरण दडपण्याचा शिक्षक आणि मुख्यध्यापकांकडून प्रयत्न करण्यात आला. अखेर विद्यार्थिनीने दौंड पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना माहिती दिली. पिडीत विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर मुख्यध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.