ईद निमित्ताने मागील दोन दिवसात जुहू चौपाटीवर उसळलेल्या गर्दीत हरवलेल्या १०० जणांचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे कुटुंबियांकडे सोपविण्यात आले आहे.
दरम्यान सांताक्रूझ पोलिसांनी मागील चार महिन्यात जुहू चौपाटीवर हरवलेल्या ४१० जणांचा आतापर्यंत शोध घेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
मुंबईतील जुहू चौपाटीवर दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात, त्यात मागील दोन दिवसात रमजान ईद मुळे पर्यटकांची संख्या कमालीची वाढली होती. शनिवारी आणि रविवारी जुहू चौपटीवर ७० ते ८० हजार पर्यटक चौपाटीवर फिरण्यासाठी आले होते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच चौपाटीवर दुर्घटना टाळण्यासाठी सांताक्रूझ पोलिसांनी मोठा बंदोबस्तासह नियंत्रण कक्ष या ठिकाणी उभारले होते. त्याच बरोबर राज्य राखीव दलाची तुकडी, लाईफ गार्ड पथक तैनात करण्यात आले होते.
हे ही वाचा:
यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !
अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने
देशात विणल्या गेले तब्बल ५० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे
साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप
जुहू चौपाटीच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यादरम्यान शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांत जवळपास १०० जण हरविल्याच्या तक्रारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
सांताक्रूझ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा व इतर तांत्रिक बाबीचा वापर करून या दोन दिवसात हरवलेल्या १००जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले आहे. मागील चार महिन्यांत जुहू चौपाटीवर हरवलेल्या ४१० जणांचा शोध घेऊन त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप सोपविण्यात आले असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली आहे.