29.6 C
Mumbai
Friday, April 25, 2025
घरक्राईमनामा१० वर्षीय मुलीचा मृतदेह वरून पडला आणि रहिवाशांना कळले भयंकर वास्तव

१० वर्षीय मुलीचा मृतदेह वरून पडला आणि रहिवाशांना कळले भयंकर वास्तव

Google News Follow

Related

मुंब्रा ठाकूरपाडा याठिकाणी एका १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्या ठिकाणी तपास केल्यावर एक मुलगी तिथे आढळली. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आसिफ मन्सुरी याला अटक करण्यात आली आहे. खेळण्याचे आमिष दाखवून या मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

यासंदर्भात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार ७ एप्रिलला रात्रपाळीचे ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना रात्रौ ११ वाजता काही महिला व पुरुष पोलीस ठाणे अंमलदार कक्ष येथे येऊन त्यांनी कळविले की ते राहत असलेल्या श्रद्धा प्राप्ती बिल्डिंग,सम्राट नगर, ठाकूरपाडा,मुंब्रा या इमारतीच्या डक्टमध्ये काहीतरी उंचावरून पडल्याचा आवाज आला. सदर इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील रूम नंबर १०३ च्या टॉयलेटच्या बाजूस असणाऱ्या डक्टकडील  खिडकी उघडी असल्याने सदर ठिकाणी टॉर्च लावून बघितले असता त्यामध्ये एक लहान मुलगी वय अंदाजे दहा वर्षे कमरेखाली कपडे नसलेल्या व पालथी पडलेल्या अवस्थेत दिसून आली.

हे ही वाचा:

मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामागे आयएसआयचा हात

पुनर्वास एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवारी जागतिक होमिओपॅथी दिन

श्रेयस अय्यर – मार्च महिन्याचा खरा सुपरस्टार

“दिग्गजांचं ‘पावरप्ले’ बंद… RCBचं वर्चस्व सुरू!”

स्वतः सपोनि माने, पोलिस उपनिरीक्षक साळुंके व डी बी पथक असे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सदर डक्ट हा चार बाय चार फूट आकाराचा असून त्याच्या तळामध्ये एक लहान मुलगी वय अंदाजे दहा वर्षे कमरेखाली कपडे नसलेल्या व पालथ्या अवस्थेत दिसून आल्याने तिला बाहेर काढण्यासाठी तात्काळ फायर ब्रिगेड, मुंब्रा येथून मदतीची मागणी केली तसेच खाजगी ॲम्बुलन्सची व्यवस्था केली. त्यानंतर थोड्याच वेळात घटनास्थळी अग्निशमन दलाचे गणेश खेताडे, केंद्र अधिकारी व स्टाफ घटनास्थळी पोहोचले फायरमन जेडी वाघमोडे व अग्नी प्रणेता सुरेश गोसावी हे शिडीच्या साह्याने सदर डक्टमध्ये खाली उतरून सदर मुलीस बाहेर काढून तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे खाजगी ॲम्बुलन्स मध्ये घेऊन व पोउपनि साळुंखे व पोलीस हवालदार गीते असे रवाना झाले.

सदर मयत मुलीचे वय दहा वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बाबत मयत मुलीची आई यांच्या खबरीवरून तक्रार दाखल करण्यात आली असून सदर तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी हे करीत आहे. तपासाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता मयत मुलगी ही ती राहत असलेल्या इमारतीखाली खेळत असताना एका इसमाने त्यांना खेळणी देण्याच्या बहाण्याने श्रद्धा प्राप्ती बिल्डिंग सम्राट नगर, ठाकूर पाडा येथे घेऊन गेल्याचे सांगितले. सदर इसमाबाबत केलेल्या वर्णनावरून आसिफ अकबर मंसूरी (वय १९ वर्षे) राहणार रूम नंबर ६०३, श्रद्धा प्राप्ति बिल्डिंग ठाकूरपाडा, मुंब्रा यास पोलीस ठाणे आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या घरामध्ये दोन लहान बालकांनी वर्णन केलेले कपडे सापडले असून त्याच्यावर रक्ताचे डाग आढळले आहेत.  सदर गुन्ह्यांमध्ये त्याचे कोणी अन्य साथीदार आहेत किंवा कसे याबाबत सखोल तपास केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
244,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा