तमिळनाडूमध्ये विषारी दारूने १० जणांचा मृत्यू

विषारी दारूचे सेवन केल्याने तीन महिलांसह १० जणांचा मृत्यू

तमिळनाडूमध्ये विषारी दारूने १० जणांचा मृत्यू

तमिळनाडूमधील विल्लुपूरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात कथित विषारी दारूचे सेवन केल्याने तीन महिलांसह १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. विल्लुपूरम जिल्ह्यातील मरक्कनम जवळ एकियारकुप्पम येथे राहणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदुरंथगम येथे शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला तर, रविवारी एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. या चौघांचाही मृत्यू विषारी दारूच्या सेवनाने झाला. सद्यस्थितीत दोन डझनांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. या १० जणांनी इथेनॉल-मिथेनॉल पदार्थ मिसळलेल्या विषारी दारूचे सेवन केले होते.

‘तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात विषारी दारूचे सेवन केल्याने मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. मात्र पोलिसांना या दोन घटनांमध्ये संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. पोलिस या दृष्टीने तपास करत आहेत,’ अशी माहिती पोलिस महानिरीक्षक एन. कन्नन यांनी दिली.

विल्लुपुरम जिल्ह्यात सहा जणांना उलटी, डोळ्यांत आग होणे तसेच, चक्कर येणे असा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यातील चौघंचा मृत्यू झाला. तर, दोघांवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा :

‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या

आता ९२८ संरक्षण उत्पादनांची निर्मिती होणार भारतात

‘मी देशभक्त असण्याची शिक्षा भोगतोय’

रुग्णालयात दाखल झालेल्या ३३ जणांची प्रकृती आता ठीक आहे. तर, चेंगलपट्टू जिल्ह्यात पाच जण रुग्णालयात दाखल होते. त्यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून काही आरोपी फरार आहेत. विषारी दारूप्रकरणात आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही जिल्ह्यांचे तीन पोलिस निरीक्षक आणि चार उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

Exit mobile version