पालघरमध्ये एका महिलेचा गाडीत विनयभंगाची घटना घडली. त्यात त्या महिलेच्या लहान मुलीला गाडीच्या बाहेर फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या महिलेलाही गाडीतून बाहेर फेकण्यात आले. यासंदर्भात त्या गाडीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.
ही मुलगी अवघ्या १० महिन्यांची होती. त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्या महिलेला गंभीर इजा झाली मात्र ती बचावली. मुंबई अहमदाबाद द्रूतगती मार्गावर ही घटना घडली.
विजय कुशवाहा असे या गाडीच्या चालकाचे नाव असून त्याला ३०४ (सदोष मनुष्यवध) आणि ३५४ (विनयभंग) या कलमाखाली अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘प्रकल्प होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले’
‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले
ठाकरे गटातील नेत्याकडून शिंदे गटातील आमदाराचं कौतुक
महाराष्ट्रात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
वाडा तालुक्यातील पोशेरे येथे ही महिला आपल्या मुलीसह जात होती. पालघरहून ती निघाली होती. त्यावेळी त्या शेअर टॅक्सीत आणखीही काही लोक होते. प्रवासादरम्यान त्या चालकाने इतर प्रवाशांसह त्या महिलेची छेड काढल्याचे म्हटले जात आहे. त्यावर त्या महिलेने त्याचा प्रतिकार केला. तेव्हा तिच्या हातून ती मुलगी हिसकावून घेण्यात आली आणि तिला गाडीच्या बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर तिलाही गाडीतून ढकलण्यात आले. या महिलेने हा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली. पण ती बचावली. मात्र त्या मुलीचा जीव वाचला नाही. ती जागीच मृत्युमुखी पडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून आरोपींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.