गिरगावात डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाख लुटणारा अटकेत

युवराजसिंग उम्मेदसिंगला घेतले ताब्यात

गिरगावात डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाख लुटणारा अटकेत

चाकूने वार करत डोळ्यात मिरची पूड फेकून १० लाखांची रोख रक्कम चोरी करणाऱ्या एका आरोपीला वि. प. मार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. युवराजसिंह उम्मेदसिंह (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे.

गिरगावातील कुरियर व्यवसायिक हरीश प्रजापति यांनी दिलेली १० लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन इंदरकुमार प्रजापती (२०) हा १७ डिसेंबरच्या सायंकाळी सहकारी अनुरागसिंग राजपुत याच्यासोबत गिरगावातील गुलालवाडी सर्कलवर असलेल्या श्रीनाथ को.ऑप. हौ. सोसायटीमध्ये गेला होता. त्यांच्या मागावर असलेले दोन लुटारुसुद्धा या इमारतीमध्ये घुसले. त्यांनी चाकूने वार करत डोळ्यात मिरची पूड फेकून १० लाखांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला.

हे ही वाचा:

मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

फडणवीस ‘बांबूंची लागवड’ करतील का?

घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!

आगरतळा रेल्वे स्थानकावर ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!

लुटीच्या घडलेल्या घटनेने इंदरकुमार आणि अनुरागसिंग घाबरले होते. त्यांनी ही माहिती मालक प्रजापती यांना दिली. त्यानंतर, त्यांच्यासोबत वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली. पोलिसांनी इंदरकुमारची फिर्याद नोंदवून घेत अज्ञात आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने युवराजसिंह याला ताब्यात घेत अटक केली आहे.

आरोपी युवराजसिंह हा राजस्थानमधील सिरोही, पिंडावाडाचा रहिवासी आहे. युवराजसिंहकडे कसून चौकशी सुरू असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version