बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात १० ठार

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात १० ठार

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका कुरकुरे आणि नूडल्सच्या कारखान्यात झालेल्या बॉयलरच्या स्फोटात १० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनेक लोक या घटनेत जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर एसपी आणि डीएम सहित सर्व प्रमुख अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी या घटनेची माहिती घेतली. मदतकार्याला वेग आला.

या बॉयलरचा स्फोट इतका मोठा होता की, तब्बल ५ किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. शिवाय, हा स्फोट एवढा मोठा होता की, त्यामुळे आजुबाजुच्या काही फॅक्टरींचेही नुकसान झाले आहे. सध्या या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या पोहोचल्या आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मदतकार्यही केले जात आहे.

या फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांनीही घटनास्थळी धाव घेतली असून त्यांच्याकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. स्फोट एवढा जबरदस्त होता की, शरीराच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे मृतांची ओळख पटविणेही मुश्कील बनले आहे. या परिसरात बाहेरून येणाऱ्या लोकांना पोलिसांनी मज्जाव केला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्दी होऊ नये याची काळजी पोलिस व्यवस्थापन घेत आहे.

हे ही वाचा:

गेले सांता कुणीकडे?

सलमान खानला साप चावला

हार्बर मार्गावर एसी लोकलच्या काचा फोडल्या

… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक

 

या कारखान्यात नेमके किती लोक काम करत होते, याची माहिती घेतली जात आहे. तूर्तास तशी ठोस माहिती हाती आलेली नाही. शिवाय, या स्फोटाचे नेमके कारण काय याचाही शोध घेतला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा स्फोट जबरदस्त होता आणि त्या कारखान्याच्या आसपासच्या भागात प्रचंड घबराट त्यामुळे निर्माण झाली.

Exit mobile version