23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाभरधाव वेगात असलेल्या बसची ट्रकला धडक बसून १० जणांचा मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या बसची ट्रकला धडक बसून १० जणांचा मृत्यू

नाशिक-शिर्डी महामार्गावर झाला अपघात

Google News Follow

Related

नाशिकमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या बसची ट्रकला धडक बसून १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून शिर्डीच्या दिशेने जात होती. दरम्यान, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पठारेजवळ ट्रकची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की खासगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अपघातात अनेकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात १५ ते २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये सात महिला, दोन मुले आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना सिन्नर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

खासगी बसमधून ३५ ते ४५ प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे.काही जखमींवर शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा