बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

एनआयए विशेष न्यायालयाने दिला निर्णय

बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

बंगळूरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच ‘एनआयए’ने मोठी कारवाई केली असून या प्रकरणी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन ताहा अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही आपली ओळख लपवून राहत होते. दरम्यान, आरोपींना बंगळूरू येथील एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर दोघांनाही १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटकेनंतर आरोपींना एनआयए विशेष न्यायालयात न्यायाधीशासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणात एनआयएला मोठे यश मिळाले आहे. कोलकाताजवळून एनआयएने मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन ताहा यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मुसावीर हुसेन शाजीबने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता तर अब्दुल मतीन ताहा हा स्फोटाची योजना आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे. एनआयएने सांगितले की, दोघे आरोपी आपली ओळख लपवून लपले होते.

हे ही वाचा:

“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला

कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर मुसावीर शाजिब बीएमटीसीच्या बसमध्ये गोरगुंटेपाल्यासाठी चढला. त्यानंतर अनेक मार्ग बदलून ते आंध्र प्रदेशात पोहोचले. तेथून पुन्हा ओडिशामार्गे कोलकाता येथे पोहोचले. दुसरीकडे अब्दुल मतीन ताहा तामिळनाडूमार्गे कोलकाता येथे पोहोचला होता. दोघेही इथे येऊन भेटले. ते दोघेही येथून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती आहे.

Exit mobile version