सोमवारी डेरा इस्माईल खान शहरातील चोडवान पोलिस स्टेशनवर रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात दहा पाकिस्तानी पोलिस कर्मचारी ठार झाले आणि सहा जखमी झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.पहाटे ३ च्या सुमारास हा हल्ला झाला.अतिरेक्यांनी पोलिस स्टेशनवर स्नायपर्सच्या माध्यमातून हा गोळीबार करण्यात आला होता. तो गोळीबार करतच हल्लेखोर पोलीस ठाण्यात शिरले.
अतिरेक्यांनी पोलीस ठाण्यात शिरकाव करत हँडग्रेनेडचा वापर केला.यामुळे पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी जखमी झाले, असे रॉयटर्सने वृत्त दिले.या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील १० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ६ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान, पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, हा हल्ला देशातील महत्त्वपूर्ण ८ फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’
२०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीला!
उत्तराखंड मंत्रिमंडळाची समान नागरी कायद्यावर मोहोर
गेल्या काही दिवसांपासून खैबर पख्तूनख्वा प्रदेश आणि बलुचिस्तानमध्ये हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, ८ फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी गेल्या आठवड्यात पाकिस्तान निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि निवडणुका वेळेवर होतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.