दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी घातलेल्या छाप्यात एक कोटी जप्त

ईडीने दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये टाकले ३५ ठिकाणी छापे

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी घातलेल्या छाप्यात एक कोटी जप्त

शुक्रवारी ईडीने दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये जवळपास ३५ ठिकाणी छापे टाकले होते. मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ईडीने छापे टाकले होते. या छाप्यात ईडीने आता बंद झालेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेनंतर सुमारे एक कोटी रुपये रोख जप्त केले आहेत.

काल ईडीने ३५ ठिकाणी छापे टाकले होते. दारू व्यापारी, वितरण कंपन्या आणि संबंधित संस्थांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये एका ठिकाणाहून सुमारे एक कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच काही डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

ईडीच्या अधिकार्‍यांनी दिल्लीस्थित एका टीव्ही वृत्तसंस्थेच्या संचालकाला अटक केली आहे. जो तेलगू दैनिकाच्या संचालक मंडळावर होते. आतापर्यंत केंद्रीय एजन्सीने या प्रकरणी आतापर्यंत १०३ हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. गेल्या महिन्यात मद्यविक्रेते आणि मद्य निर्माता कंपनी इंडोस्पिरिटचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना अटक केली आहे. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आरोपी म्हणून नाव आले होते.

हे ही वाचा:

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

सिरीज पाहून बँक मॅनेजरनेच केली बँकेत चोरी

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ च्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतर मद्य धोरण छाननीखाली आले. याप्रकरणी त्यांनी उत्पादन शुल्कच्या अकरा अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते. ईडीने आपचे आमदार दुर्गेश पाठक आणि तिहार तुरुंग मंत्री सत्येंद्र जैन यांचीही चौकशी केली होती. तर सीबीआयने व्यापारी विजय नायर यांना अटक केली आणि अटक केलेल्या अनेकांची चौकशी केली होती.

Exit mobile version