भारतीय तटरक्ष क दलातील जवानाला पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष देऊन सायबर चोरटयांनी वेगवेगळे टास्क देत जवानांच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये उकळ्याची घटना कुलाबा येथे घडली. या घटनेसंदर्भात कफ परेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संबंधित पीडित २१ वर्षीय सैनी भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असून, आजारी असल्याने कुलाबा येथील नौदलाच्या रुग्णालयात महिन्याभरापासून उपचार घेत आहेत. ६ जुलै रोजी टेलिग्राम वरून निता नावाच्या महिलेने पार्ट टाईम नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत का ? अशी विचारणा केली. सैनी यांनी होकार देताच, महिलेने युजरनेम व पासवर्ड पाठवत टेलिग्राम अँपवर संपर्क करण्यास सांगितला. सैनी याला हेबी नाव सांगणाऱ्या व्यक्तीने दिवसाला १ ते १००० रुपये कमावण्यासाठी एक लिंक पाठवली. लिंक उघडून बघितला असता वेबपेज एखाद्या अँप्लिकेशन सारखे दिसत होते. नंतर त्यावर वेगवेगळे टास्क देऊन कमिशन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
संजय राऊत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत
“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल
क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव
पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी
सैनी यांनी ही कंपनी २०२० मध्ये सुरु झाली असून, कंपनीचा ऑफिस अंधेरी येथे असल्याचे सांगितले. सैनी यांना ६८ हजार १३१ रुपये भरून घेत सहा टास्क देण्यात आल्या. टास्क पूर्ण झाल्यानंतर सैनी यांच्या बँक खात्यावर १ लाख ३० हजार रुपये जमा झाल्याचे दिसू लागले. खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघाले नाहीत. पैसे खात्यात जमा करण्यासाठी कर म्हणून १९ हजार ५०५ रुपये घेण्यात आले. जमा केलेली रक्कम खात्यात दिसत नव्हती. त्यासाठी पुन्हा ५९ हजार रुपये भरून टास्क पूर्ण करावा लागेल असे सांगण्यात आले. मिळालेले कमिशन खात्यात जमा झाले नव्हते. या संदर्भात सैनी यांनी कफ परेड पोलीस स्थानकात आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदवला.